Secret Rapper

#आई# Marathi Rap Song ( Ft. shaggy )

Secret Rapper
#आई# Marathi Rap Song ( Ft. shaggy )

135 Plays

16 Aug 2021

देव मला पावला, त्याने स्वर्ग मला दावला जन्म घेऊन तुझ्या उदराशी जीव सुखावला आ म्हणजे आत्मा आणि इ म्हणजे ईश्वर आई तुजवीण सारे जग हे नश्वर अन हर एक अक्षर फक्त तुझेच वर्णन माझ श्वास माझे जीवन आई तुझ्या चरणी अर्पण जेव्हा जेव्हा चुकलो तेव्हा तूच केली शिक्षा तुझ्या संस्काराची विसरणार नाही भिक्षा अडलो पडलो अडखळलो सावरतो तुझा हात अवघड वाटेवरती आई सावली परी तू साथ आई वात जणू तू दिव्याची वात काय जळवुनी सारी प्रकाश अंधारात डोळ्यांनी तुझ्या पाहिले म्या अवघे सप्तरंग नाव तुझे घेता मुखी बोले पांढुरंग सूर शब्द ताल सारे आळवुनी मुखात आई शब्द नाद साऱ्या आसमंतात देव मला पावला, त्याने स्वर्ग मला दावला जन्म घेऊन तुझ्या उदराशी जीव सुखावला रात्री झोपताना........गोष्ठी मला सांगायची अभ्यास सोडून गेम खेळलो की मला झोडायची खोड्या केल्या मस्ती केली.... खूप ओरडायची दप्तराचे ओझं झेलून शाळेत सोडून यायची मार्क कमी आले की मग खूप.... चिडायची जवळ घेऊन चुकाऊंचा घास भरवायची तिच्या सावलीत निघाले अवघे हे ते माझे बालपण मोठा झालो आता तरी लहान तिच्यासाठी आजपण तहान भूक सोडून सारी सर्वांसाठी झुरतेस काळजी स्वतःची सोडून नेहमी दुसऱ्यांच्या विचार करतेस सकाळी अर्ध्या झोपेतून तू काशी काय उठतेस रोज सकाळी उठून सर्वना डब्बा बाणवून देतेस मग जेवणं धुणीभांडी साफसफाई पण करतेस स्वतःची इच्छा मारून दुसऱ्यांची पूर्ण करतेस तुझ्या प्रेमाने घराला... घरपण भरून देतेस तरीही लोक म्हणतात आई कुठे काय करते आई खूप काही करते रेस्पेक्ट

2 Comments

Leave a comment

10 months ago

I'm feeling this ❤️

3 years ago

You may also like